मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना रक्कम भरणा करावी कि नाही ?

 मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना रक्कम भरणा करण्यासाठी पोर्टल चालू झाले असून गावातील सोलर पंप  मंजूर असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरणा करावा जेणेकरून आपणास विहीर किंवा बोअर वर  सोलर पंप बसवला जाईल...




सोलर पंप पैसे भरणा करण्याअगोदर  शेतकऱ्यांना पडणारे प्रश्न आणि त्याचे उत्तरे 

  • सोलर पंप येईलच याची शाश्वती आहे का ....?

हो नक्कीच छाननी अंतर्गत जर अर्ज सर्व निकषांमध्ये बसत असेल तर सोलर पंप हा नक्कीच तुम्हाला तुमच्या शेतामध्ये बसवून दिला जाईल ...

  • पैसे भरणा केल्यानंतर किती दिवसात सोलर पंप मिळेल ...?

अर्ज करण्यापासून ते मंजूर होईपर्यंत याचे ४ टप्पे पडतात 

१)  सोलर पंप साठी नवीन अर्ज करणे 

२)  सोलर पंप साठी रक्कम भरणा करणे 

३)  पंप साठी दिलेल्या कंपन्यांमधून तुम्हाला योग्य वाटत असेल ती कंपनी निवडणे 

४)  ज्या शेतात पंप बसवायचा असेल त्याचे पोर्टल अधिकारी द्वारे पडताळणी (SPOT VERIFICATION) करणे 


या सर्व बाबी साठी लागणारा कालावधी हा सांगता येऊ शकत नाही परंतु अर्ज केल्यापासून ६ महिन्याच्या आत सोलर पंप येऊ शकतो .....

  • अर्ज जर पडताळणी मध्ये बाद झाला तर काय होईल ....?
जर पडताळणी मध्ये अर्ज बाद झाला तर पुन्हा एकदा पडताळणी करण्यासाठी मुभा दिली जाते त्यानंतर हि जर अर्ज निकष मध्ये पात्र नाही झाला तर तुम्ही केलेला भरणा १००% कुठलीही रक्कम वजा न करता आपणास आपल्या बँक खात्यावर पाठवली जाते .....

गावातील प्रगतशील शेतकरी ज्यांनी त्यांच्या ५ HP सोलर पंप साठी भरणा करण्याचा पहिला मान रोहिदास संदीपान मस्के यांनी मिळवला आहे. भरणा केल्या नंतर त्यांना पोर्टल वरून मिळालेली रीतसर पावती तसेच पोर्टल वरून त्यांना आलेला MASSAGE खालील प्रमाणे :

पावती:



MASSAGE:



मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना" रक्कम भरणा करण्यासाठी संपर्क:


रुद्र ऑनलाईन सर्विसेस 

बीड महाराष्ट्र 

नितीन भाऊसाहेब मस्के

Web:www.rudrahelps.in

Mo. 9673067097




0 टिप्पण्या